‘भारत-पाक’मध्ये तणाव चालु असतानाच गायक मिका सिंहचा ‘कराची’त ‘कार्यक्रम’, लोकांकडून ‘थू-थू’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंह सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, चर्चेचं कारण मिकाच्या नव्या सिनेमाचे गाणे वेगेरे काही नाही तर मिका एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये मिका एका ठिकाणी गाण्याचा परफॉरमन्स देताना दिसत आहे. मात्र चर्चा होतीय ती त्या ठिकाणाची. कारण हा व्हिडीओ पाकिस्तानच्या कराची मधील असल्याचे बोलले जात आहे.
भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे, त्यामुळेच दोन्हीही देशाच्या आर्टिस्टने एकमेकांच्या आर्टिस्टला आपापल्या देशात परफॉर्म करण्यासाठी बंदी घातली आहे. यामुळेच मिका सिंहचा कराची मधील परफॉर्मन्स चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्तानी गायक फाकीर महमूद यांनी मिकावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणालाय नेमकं फाकीर महमूद

मीकाच्या पेर्फोर्मन्सचा व्हिडीओ शेअर करत फाकीर महमूद म्हणतो, काश्मीर पूर्णपणे लॉकडाऊन आहे, तरीही एक भारतीय सिंगर येतो, परफॉर्म करतो आणि पैसे कमावून निघून जातो. जस काही झालेलंच नाही, धर्म आणि देशभक्ती फक्त गरिबांसाठीच आहे.

https://twitter.com/Faakhir_Mehmood/status/1159761327772098560

एका पाकिस्तानी पत्रकाराने याला उत्तर देत असे म्हंटले आहे की, मी खुश आहे मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात कराचीमध्ये मिकाने परफॉर्मन्स केला.

बाॅलिवूड फिल्म इंडस्ट्रीने स्वतः हा निर्णय घेतला होता की, भारत पाकिस्तान संबंध सुधारत नाहीत तो पर्यंत पाकिस्तानी कोणीही आर्टिस्ट भारतामध्ये काम करणार नाही.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपुर्ण परिस्थिती असताना देखील गायक मिका सिंहने कराचीत जाऊन गायनाचा कार्यक्रम केल्यामुळे त्याच्यावर समाजातील सर्वच स्तरातून टिका होत आहे. एवढेच नव्हे तर काही लोकांनी तर चक्क त्याच्यावर खरमरीत टिका केली. असं करायला त्याला लाज कशी वाटली नाही असे ही लोक म्हणाले आहे. समझोता एक्सप्रेस, दिल्ली-लाहोर बस सेवा पाकिस्ताननं बंद केली. एवढेच नव्हे तर पाकिस्तानने भारताशी असलेले व्यापारी संबंध देखील तोडले असताना मिका सिंहने कराचीत कार्यक्रम केल्यामुळे लोक त्याच्यावर ‘थू-थू’ करीत आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त –