भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून ‘कौतुक’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सीमा वादावरून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी चीनवर सडकून टीका केली आहे. कोणत्याही शेजारी देश असा नाही की, ज्यासोबत चीनचा सीमा विवाद झालेला नाही, असे माईक पोम्पीओ म्हणाले, अलीकडेच चीनने भूतानबरोबरच्या आपल्या सीमा वादाचा उल्लेख केला आहे. तर लडाखमध्ये चिनीने घुसखोरी केल्याबद्दल भारताने घेतलेल्या भूमिकेचीही त्यांनी कौतुक केले आहे.

भारत-चीन सीमा वादावर माईक पोम्पोओ म्हणाले, मी याबाबत भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. चीनने कोणत्याही कारणाशिवाय आक्रमक कृत्य केले आणि भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. याशिवाय चिनी कम्युनिस्ट पार्टीने अलीकडेच भूतानशी झालेल्या सीमा विवादांचा संदर्भ दिला. हिमालयाच्या पर्वत रांगांपासून समुद्रापर्यंत व्हिएतनामच्या सेनकाकू बेटांचा चीनशी सीमा विवाद आहे. चीनमध्ये प्रादेशिक वाद भडकवण्याचा एक पॅटर्न आहे, असे माईक पोम्पीओ यांनी म्हटले आहे. विदेशी देशांपेक्षा स्वत:च्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी चीनला अधिक भीती वाटते.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीजवळ विश्वसनीयतेची समस्या आहे. ते जगाला कोरोना विषाणूचे सत्य सांगण्यात अपयशी ठरले आहेत. ज्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच चिनी अ‍ॅप टिकटॉकवरील बंदीबाबतही माईक पोम्पीओ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही अमेरिकन नागरिकांची गोपनीयता आणि त्यांच्या डेटाच्या संरक्षणाठी वचनबद्ध आहोत. अमेरिकन लोकांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही त्यांचे सातत्याने मूल्यांकन करत आहोत.