जपानमध्ये होणार डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जपानमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेवेळी भेट होणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची देखील भेट घेणार आहेत. यावेळी या तीन नेत्यांमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.

जपानमधील ओसाका येथे २८ आणि २९ जून रोजी हि परिषद पार पडणार आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष ट्रम्प या दोन नेत्यांबरोबरच इतर जागतिक नेत्यांबरोबर देखील बैठक घेणार आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरच्या अनेक विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा होऊन अनेक विषयांवर मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या जी-२० परिषदेत ट्रम्प ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एच वन बी व्हिसा, इराणवरील निर्बंधांमुळे भारताची इंधन अडचण, दोन्ही देशांनी लादलेले वाढीव शुल्क आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

आरोग्य विषयक वृत्त

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण