Mild Products | आंघोळ करताना साबणाच्या फेसाने घेतला पेट, 4 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी; स्वस्त साबणाचा परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mild Products | मुलांची त्वचा खुप नाजूक (Sensitive Skin) असते. यामुळे पालक नेहमी मुलांसाठी माईल्ड प्रॉडक्ट (Mild Products) वापरतात. परंतु, अनेकदा पैसे वाचवण्याच्या नादात क्वालिटीसोबत तडजोड केली जाते. अशाच प्रकारे इंग्लंडच्या लिव्हरपूल (Liverpool, England) मध्ये राहणार्‍या एका महिलेने आपल्या मुलासाठी अतिशय स्वस्त साबण (Cheap Soap Accident) खरेदी केला होता. या साबणाने आंघोळ करताना घडलेल्या दुर्घटनेमुळे मुलाला थेट हॉस्पिटलच्या बर्निंग वॉर्ड (Burning Ward) मध्ये अ‍ॅडमिट करावे लागले.

हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर सर्वजण हैराण झाले. लिव्हरपूल इकोच्या वृत्तानुसार, 4 वर्षाच्या ऑस्कर बेडार्ड (Oscar Bedard) यास हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. ऑस्करचे शरीर पूर्णपणे भाजले होते, या स्थितीला जबाबदार होता बाजारातून आणलेला स्वस्त साबण. ऑस्करच्या 31 वर्षीय वडिलांनी सांगितले की, साबणाच्या फेसाला आग लागल्याने ही दुर्घटना घडली.

बाथरूम जळत होती मेणबत्ती
ऑस्करच्या वडिलांनी सांगितले की, ते त्यांच्या मुलाला बाथरूममध्ये आंघोळ घालत होते.
त्यावेळी बाथरूममध्ये काही कँडल जळत होत्या. ऑस्कर खुप आनंदाने आंघोळ करत होता.
अचानक त्याच्या शरीरावर जमलेला फेस मेणबत्तीच्या संपर्कात आला. यामुळे आग लागली.
पाहता-पाहता त्यांचा चार वर्षांचा मुलगा आगीचा गोळा बनला. ऑस्कर डोक्यापासून पायापर्यंत भाजला होता.

तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले
यानंतर पालकांनी ताबडतोब ऑस्करला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
घटनेनंतर जॉनाथन यांनी साबण कंपनीवर खटला दाखल केला आहे.
अद्याप साबण कंपनीकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.

Web Titel :- Mild Products | 4 year old baby turns to ball of flames after cheap soap foam catches fire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पन्नाशीत राज्यमंत्रिपदावर खेळत बसलेत’; काँग्रेस नेते सतेज पाटलांना अजितदादांची कोपरखळी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 253 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Edible Oil Rate | सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! खाद्य तेलाच्या दरात घट, जाणून घ्या