विमानाच्या टॉयलेटमध्येच ‘जोडपं’ आढळलं, त्यानं केला व्हिडीओ शुट नंतर फक्‍त ‘कल्‍ला’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका विमानात बाथरूमला जाण्यासाठी काही महिला रांगेमध्ये थांबल्या होत्या. तेवढ्यात बाथरूम मधून एक कपल बाहेर पडले. या घटनेचा व्हिडीओ अमेरिकेच्या एका प्रसिद्ध बीच व्हॉलीबॉल प्लेयर स्टेफर्ड स्लिकने याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ मध्ये असे दिसत आहे की, त्यात महिला आणि पुरुष या दोघांनीही लाल रंगाचे स्वेटशर्ट अंगावर परिधान केले आहे.

स्टॅफर्ड स्लिक याने कैद केला व्हिडीओ
याबाबत एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करत स्टेफर्ड याने असे म्हटले आहे की, मी आत्तापर्यंत असे बाथरूम मधून कपल बाहेर आल्याचे प्रथमच पहिले आहे. बाकी त्याने ही घटना कोठे घडली, कोणत्या विमानात घडली याबाबत अधिक काहीही शेअर केलेलं नाहीये. स्टेफर्ड ने म्हटले की, कपल जेव्हा बाथरूम मधून बाहेर आले तेव्हा अनेक महिला बाथरूमला जाण्यासाठी रांगेत थांबल्या होत्या. त्यांनी कपलला पाहून काहीच रिऍक्ट केले नाही.

सोशल मीडिया वर अनेक कमेंट
व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक आवाज ऐकू येत आहे. तो आवाज फ्लाईट अटेंडंट असलेल्या महिलेचा वाटतो. ती महिला विचारते की, तुम्ही आणखी इथेच आहेत. त्यावर विमानातील इतर प्रवासी महिला सांगतात की, तिकडे लोक आहेत. याच्या काही वेळानंतर एक कपल बाथरूम मधून बाहेर आल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. सोशल मेडिया वर या व्हिडीओ वर अनेक कंमेंट होताना दिसत आहे. लोक म्हणत आहेत की, असे कसे काय एखादे कपल बाथरूम मध्ये एकत्र जाऊ शकते. फ्लाईट अटेंडंट यांनी चौकशी केली पाहिजे असेही काहींनी म्हटले आहे.

Loading...
You might also like