‘ब्लैक मिरर’च्या पाचव्या सीजनमध्ये सहभागी होणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलीविजन सीरिज ‘ब्लैक मिरर’ च्या पाचव्या सीजनला ५ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये गायिका व अभिनेत्री माईली सायरस सहभागी असणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नेटफिक्सने या ‘शो’ च्या पाचव्या सीजनची घोषणा केली आहे.

या साइंस फिक्शन एंथोलॉजी सीरीजमध्ये चार्ली ब्रूकर आणि एन्नाबेल जोन्सची तिन नवीन कथा असेल. यामध्ये एंथोनी मैकी, सायरस, अब्दुल-मतीन २, टोफर ग्रेस, डैमसन इदरिस, एंड्रयू स्कॉट, निकोल बेहरी, पोम क्लेमेन्टिफ, ऐंग्यूरी राइस, मैडिसन डेवनपोर्ट आणि लुडी लिन आदी कलाकार सहभागी असणार आहे.

पुन्हा एकदा या कथांमध्ये प्रौद्योगिकीची प्रथमिकता दिली आहे. या सीजनमध्ये ही आर्टीफिशिअल इंटेलीजेंस, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि वर्टुअल रियेलिटीची स्थिती खोलवर दाखविली जाणार आहे. यामध्ये सायरस अशी भूमिका साकारताना दिसेल जसे की, जिचे हजारो चाहते आहेत. सीजनमध्ये असे दाखविले जाणार आहे की, तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचण्यासाठी कोणत्या संक्रमण माध्यमातून जावे लागते.

You might also like