जगातील ‘टॉप’ स्टार ‘मायली सायरस’ चा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील टॉप स्टार मायली सायरस (Miley Cyrus) सध्या वाईट काळातून जात आहे. लियाम होम्सवर्थसोबतचं (Liam Hemsworth) तिचं लग्न केवळ 8 महिने टिकलं. त्यामुळे मायली खूपच दु:खी आहे. हे लग्न मोडताना तिच्यावर फसवणूक केल्याचे आरोप झाले आहेत. लियामने घटस्फोटासाठी खटला दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशीच 26 वर्षीय अभिनेत्री मायली सायरसने इंस्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहीली होती.

मायलीनं पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “मी सगळं मान्य करू शकते. परंतु फसवणुकीमुळे लग्न मोडल्याचं मी मान्य नाही करू शकत. मी गुन्हा लपवण्यासाठी असं करत आहे असं काही नाही.” ती लियामसोबत पूर्णपणे कमिटेट आहे असं तिचं म्हणणं आहे.

मायली सायरस आणि लियाम हेम्सवर्थ 2009 साली भेटले होते. गेल्या वर्षी पर्यंत ते एकमेकांना डेट करत होते. त्यांचं बिनसलंही होतं. परंतु नंतर सर्वकाही ठिक होतं. तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “माझ्या जीवनात काहीच सिक्रिटे नाही. माझं लियामवर खूप प्रेम आहे. परंतु या वळणावर मला एक चांगला निर्णय घ्यायला हवा.”

 

Visit : boldnews24.com