लोकसभा निवडणुकीतील पराभावनंतर राहूल गांधींसह ‘या’ 9 दिग्गज नेत्यांचा राजीनामा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्राला सुरुवात झाली, देशातील काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपण राजीनामा देत असल्याचे सांगत ट्विट केले.

त्यांनी राजीनामा देऊ नये अशी अनेक काँग्रेस नेत्यांचे मत होते, परंतू काँग्रेसचा पराभव मान्य करुन ते अनेक दिवसांपासून राजीनाम्याच्या तयारीत होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील इतर नेत्यांना पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपआपल्या पदाचा राजीनामा दिला.

यात काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

१. हरीश रावत – हरीश रावत हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते AICC च्या महासचिव पदी होते. उत्तराखंड आणि असाममध्ये पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राज्यात त्यांच्यावर पक्षाचा भार देण्यात आला होता.

२. राज बब्बर – अभिनेते आणि काँग्रेस नेते अशी ओळख असलेले राज बब्बर यांनी उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी निवडणूकीचा निकाल मान्य करुन राजीनामा दिला आहे. पक्षाला उत्तर प्रदेशात फक्त १ जागा जिंकण्यात यश आले आहे. ती जागा देखील सोनिया गांधी यांनी जिंकली असून ती रायबरेली आहे.

३. विवेक तनखा – काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेले विवेक तनखा यांनी पक्ष पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले होते.

४. पुनम प्रभाकर – तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचा पुनम प्रभाकर यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

५. नाना पटोले – महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि किसान काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. पटोले यांचा नितीन गडकरी यांनी नागपूरातून पराभव केला.

६. सुनिल जखर – सुनिल जखर यांचा भाजपच्या उमेदवार सनी देवोल यांनी पराभव केला. त्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारात त्यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

७. गिरीष चोदणकर – गोव्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष पद होते. ते म्हणाले की ते तोपर्यंत गोवा काँग्रेसचे अध्यक्ष पद तो पर्यंत संभाळतील जो पर्यंत कोणी इतर पदभार स्वीकारत नाही.

८. मिलिंद देवरा – मिलिंद देवरा यांनी देखील राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आपला राजीनामा दिला आहे. मुंबईतील पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

९. ज्योतिरादित्य सिंधिया – काँग्रेस पक्षाला मध्य प्रदेशात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक