मिलींद मोहिते यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वरिष्ठ पोलिस अधिकारी मिलींद लालासाहेब मोहिते यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश आज (गुरूवार) संध्याकाळी काढले आहेत. दरम्यान, आणखी काही पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही वेळापुर्वीच गृह विभागाकडून हा आदेश काढण्यात आलेला आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये बारामती येथे असलेल्या जयंत मीना यांची समादेशक, भारत राखीव बटालियन गट क्र. 16 (कोल्हापूर) येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर मिलींद मोहिते यांची बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी मिलींद मोहिते हे राज्य महामार्ग पोलिस पुणे येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते तर त्यापुर्वी त्यांनी सोलापूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजाविलेले आहे. दरम्यान, पुणे शहर पोलिस दलात देखील मिलींद मोहिते यांनी यापुर्वी कर्तव्य बजावलेले आहे. बारामतीचे अतिरिक्त अधीक्षक जयंत मीना यांची बदली झाली असून आता मिलींद मोहिते हे बारामतीच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारतील.