राज्य महामार्गच्या पुणे पोलीस अधीक्षकपदी मिलिंद मोहिते यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने 12 पोलीस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्‍तांच्या आज बदल्या केल्या आहेत. पुण्याच्या राज्य महामार्गच्या (Highway Police) पोलीस अधीक्षकपदी मिलिंद मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

जयंत मीना-आयपीएस (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), पौर्णिमा चौगुले (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्‍त, नाशिक शहर), विजय मगर (पोलिस उपायुक्‍त, नाशिक शहर ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक), प्रशांत विजयकुमार वाघुंडे (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला), विजय सुरेश चव्हाण (अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक-पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन ते अप्पर पोलिस अधीक्षक, वाशिम), मितेश घट्टे (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते पोलिस उपायुक्‍त, पुणे शहर), अशोक मोराळे (पोलिस उपायुक्‍त, पुणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे हे पद पोलिस अधीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे असे अवनत करून), शर्मिष्ठा वालावलकर (पोलिस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, अमरावती- पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन ते अप्पर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), चेतना तिडके (पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नागपूर-पदोन्‍नतीने पदस्थानेच्या आदेशाधीन ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), डॉ. वैशाली कडूकर (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक-पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, कोल्हापूर), मिलिंद मोहिते (अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, राज्य महामार्ग पोलीस, पुणे) आणि अमोल तांबे (पोलीस अधीक्षक, राज्य महामार्ग, पुणे ते अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण).

मिलिंद मोहिते हे सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. आता त्यांची नियुक्ती पुण्यात राज्य महामार्ग विभागात करण्यात आली आहे.