Milind Narvekar | ‘मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायकास धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना धमकीचा मसेज (threatening whatsapp message) आला आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना आलेल्या मेसेजमध्ये मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ईडी आणि सीबीआय लावू, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यामध्ये मागिल काही दिवसांपासून ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) कारवाईला वेग आल्याचे पहायला मिळत आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाईमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा (Modi government) हात असल्याचा दावा सत्ताधारी महाविकास आघाडीमधील (MVA) नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. परंतु भाजपकडून (BJP) सत्ताधाऱ्यांचे हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. यातच आता मिलिंद नार्वेकरांना आलेल्या धमकीच्या मेसेजमुळे खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे नेते आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज पाठवला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए (NIA) आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे (Mumbai Police Crime Branch) याचा तपास सोपवण्यात आला असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

मागण्यांचा तपशील नाही
मिलिंद नार्वेकर यांना ज्या व्यक्तीने धमकीचा मेसेज केला आहे. त्या मगाण्यांचा कोणत्या आहेत याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु, या अज्ञात व्यक्तीने केलेल्या मागण्या नार्वेकर यांनी पूर्ण न केल्यास त्यांच्यामागे चौकशी लावण्याची धमकी दिली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असून ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या पैकी त्यांचे नाव आघाडीवर आहे.

 

व्हर्चुअल नंबरवरून मेसेज

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की,
हा मेसेज करण्यासाठी ज्या नंबरचा वापर झाला आहे तो नंबर कुठल्यातरी अ‍ॅप्लिकेशनचा वापर करुन घेतला आहे.
ज्याला व्हर्चुअल नंबर (Virtual number) असे देखील म्हटले जाते.
आम्ही मोबाईल कंपन्यांकडे या नंबरसंदर्भात माहिती मागवली आहे.
याप्रकरणामागे नेमकं कोण आहे याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

Advt.

Web Title :-  Milind Narvekar | cm uddhav thackeray pa and shiv sena secretary milind narvekar received threatening whatsapp message

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Corruption | जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मागितली लाच; प्राचार्यासह एक जण अटकेत

Pune Pollution | पुण्यासह 18 शहरात प्रदूषण वाढले; मुंबई, सांगली, सोलापूरही ‘प्रदूषित’

BJP Jan Ashirwad Yatra | महाराष्ट्रात BJP ची नवी दुहेरी रणनीती; ‘या’ मंत्र्यावर सोपवली मोदी सरकारने मोठी जबाबदारी