Milind Narvekar | किरीट सोमय्या यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अखेर ‘जमीनदोस्त’

रत्नागिरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (Dapoli) तालुक्यातील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला बंगला (Bungalow) अखेर रविवारी जमीनदोस्त झाला आहे. भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी याबाबत विविध यंत्रणांकडं तक्रारी करून कारवाईसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी स्वत:च अनधिकृत बंगल्याचे बांधकाम बुलडाेझर लावून ताेडून टाकले आहे. बंगल्याचे पाडकाम केल्याने राजकीय वर्तुळात चर्चासत्राला उधाण आलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:हून हा बंगला पाडल्याची माहिती किरीट साेमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी ट्विट करून दिली आहे.
त्यामध्ये त्यांनी अखेर अनधिकृत असलेला हा बंगला मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना पाडावा लागल्याचे म्हटले आहे.
हा बंगला पाहण्यासाठी आपण स्वत: दापाेलीला जाणार असल्याच देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
सोमय्या यांनी दापाेली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनारी मिलिंद नार्वेकर यांनी CRZ कायद्याचे उल्लंघन करून आलिशान बंगला बांधल्याचा आराेप केला होता.
त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर वारंवार पाठपुरावा करून जिल्हा प्रशासनापासून ते केंद्र सरकारपर्यंत तक्रारी दाखल केल्या होत्या.

दरम्यान, मुरूड येथील समुद्रकिनारी असणारा बंगला बांधला होता.
समुद्रकिनाऱ्याजवळील 72 गुंठे जागेत 500 स्क्वेअर फुटांमध्ये बंगल्याचे बांधकाम सुरू केले हाेते.
हा बंगला सीआरझेड (CRZ ) कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा दावा साेमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केला हाेता.
या प्रकरणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल येथे खटला सुरू हाेता.
जिल्हा किनारा मॅनेजमेंट कमिटी आणि महाराष्ट्र काेस्टल झाेन ऑथाॅरिटीकडून नाेटीसही बजावण्यात आली हाेती.

 

Web Title : milind narvekar demolished his bungalow dapoli after bjps kirit somaiya allegations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | गरजूंच्या जमिनी पैशाच्या अमिषाने लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात, शिक्रापूर पोलिसांत 7 जणांवर गुन्हे; चौघांना अटक तर तिघे फरार

Rain in Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा पावसाची विश्रांती; जाणून घ्या कधी होणार वापसी

Viral Video | कलयुग ! मुलगा पैशांसाठी भररस्त्यात आईला फरफटत होता, कुत्र्याने दाखवली इमानदारी, पहा Video