Milind Narvekar | ‘अष्टपैलू’ मिलिंद नार्वेकरांच्या टी-शर्टवर ‘धनुष्यबाण’, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे -Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे समर्थक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) दोन दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण, त्यांनी उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना ट्वीटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) भाजप (BJP) किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न शिवसेना आणि इतर पक्षांना पडला होता.
मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कारण, मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या (MCA – Mumbai Cricket Association) सदस्यपदाच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. ते विक्रमी मतांनी निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाच्या जाहिराती झळकल्या आहेत. त्यात नार्वेकरांनी परिधान केलेला टी-शर्ट प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे. नार्वेकरांच्या टी-शर्टवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह (Dhanushyaban Symbol) आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि नाव गोठविले होते. त्यामुळे त्यांच्या या टी-शर्टची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल (Mashal Symbol) हे नवे चिन्ह मिळाले आहे, तर शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या टी-शर्टवरील चिन्हाचा कोणाल बोध होत नाही.
त्यातच त्यांच्या अभिनंदनपर फ्लेक्स वरील मजकूर देखील वाचण्यासारखा आहे. एमसीएच्या सर्वोच्च कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्वाधिक मतांनी जिंकलेले ‘अष्टपैलू’ मिलिंद नार्वेकर यांचे अभिनंदन, असे जाहिरातीत म्हंटले आहे.
भाजप आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आता कुठे खरा पेटला होता.
अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By Election) जनतेने ते सर्व काही पाहिले होते.
त्यातच मिलिंद नार्वेकरांचे अमित शहा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन हा देखील चर्चेचा विषय झाला होता.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला ठाकरे कुटुंबातील लोक गैरहजर होते.
तरी देखील मिलिंद नार्वेकरांचा 221 मतांनी विजय झाला.
त्यानंतर नार्वेकर यांनी वांद्र्याला जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
दिवाळीच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट होती, असे बोलले जात आहे.
ठाकरेंनी क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल नार्वेकरांचे अभिनंदन देखील केले.
Web Title :- Milind Narvekar |dhanushyabaan logo on milind narvekar t-shirt starts
new political debate about joining bjp or eknath shinde camp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | सिमेंट ऑर्डरचे पैसे मागण्यास गेलेल्या व्यावसायिकाला दाखवला पिस्तुलाचा धाक, निर्मिती डेव्हलपर्सच्या दोघांवर FIR
- Shivsena Party Chief Uddhav Thackeray | त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, शिंदे गटाच्या प्रवक्त्याची उद्धव ठाकरेंच्या दौर्यावर टीका
- Maharashtra Recruitment | शिंदे-फडणवीसांचा मोदी फॉर्म्युला! येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 75000 नोकऱ्या देण्याचा सरकारचा दावा