#AnniversarySpecial : मिलिंद सोमन आणि अंकिता कुंवरचा ‘हा’ UNSEEN व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिटनेस फ्रीक, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमन यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील आलिबाग येथे आपल्या प्रेयसी अंकिता कुंवर हिच्या सोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं आहे. याचेच निमित्त साधत दोन्हीही कपलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी छान असं कॅप्शनही दिलं आहे. दोघांनीही एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मिलिंद आणि अंकिता या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांचं लग्न खूपच चर्चेत आलं होतं.

लग्नाचे विधी सुरु असतानाचे व्हिडीओ शेअर करत मिलिंद सोमन यांनी लिहिलं आहे की, “मागील वर्ष खूपच सुंदर होतं. परंतु तुझ्याइतकं सुंदर नक्कीच नव्हतं. अंकित नेहमीच खुश रहा.” दुसरीकडे अंकिताने देखील हाच व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहलं आहे की, “मागली वर्ष आनंदाने भरभरून गेलं. एक अशी सोबत मला लाभली ज्याचं मी नेहमीच स्वप्न पाहिलं होतं. तुझं असणं हे माझ्या संसाराला अधिक सुंदर बनवतं. प्रत्येक दिवशी तू मला छान बनवत आहेस.”

मिलिंद आणि अंकिता यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दोघेही लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहेत. दोघांचीही खूप रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. वधू-वराच्या पोषाखात दोघेही सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत. या व्हिडीओत लग्न, संगीत, आणि मेंदीचे विधी एन्जॉय करताना दिसत आहेत. यात मिलिंद आणि अंकिता डान्स करतानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक त्यांचे चाहते त्यांना सोशलवर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

मिलिंद सोमन यांचं वय 53 वर्षे असून अंकिता ही 27 वर्षांची आहे. पारिंपरिक रितीरिवाजाने लग्न केल्यानंतर दोघांनी 11 जुलै 2018 रोजी स्पेनमधील barefoot मध्ये पुन्हा लग्न केलं होतं. मिलिंद सोमन यांच्यासारखंच त्यांची पत्नी अंकिताही फिटनेसबाबत विशेष काळजी घेत असते. हे कपल सोशलवरही चांगलंच सक्रिय असतं.