बायकोला उचलून मिलिंद सोमण यांच्या बैठका

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – तरुणींमध्ये सर्वाधिक पसंतीस असणाऱ्या मिलिंद सोमण यांचा एक नवीन व्हिडीआे समोर आला आहे. त्यामध्ये त्यांची 25 वर्षे लहान बायकोही आहे. मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर या दम्पत्याचा हा व्हिडीआे आहे. सदर व्हिडीआेमध्ये  मिलिंद सोमण बैठका मारत आहेत परंतु या बैठका थोड्या वेगळ्या आहेत. मिलिंद सोमण हे आपली पत्नी अंकिताला उचलून बैठका मारताना दिसत आहेत. इतकेच नाही तर तेथे उपस्थित मंडळी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दोघांना दाद देताना दिसत आहेत.
मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर हे दोघेही मॅरेथाॅन रनर आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी 22 एप्रिलला अलिबागमध्ये जाऊन लग्न केलं. या लग्नानंतर ही जोडी चर्चेचा विषय ठरली. त्याला कारणही तसंच आहे. हे दोघेही मॅरेथॉन रनर आहेत पण याही पेक्षा दोघांच्या वयामध्ये खूप अंतर असण्या बाबतीत लोकांना जास्त स्वारस्य आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्यावर्षी त्याने आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. याशिवाय लवकरच तो ‘इंडियाज नेक्स्ट सुपरमॉडेल’ मध्ये जज म्हणून दिसणार आहे. अलिबागमध्ये लग्न केल्यानंतर १२ जुलैला स्पेनमध्ये दोघांनी बेअरफूड वेडींग केले.
जेव्हा मिलिंद यांना पत्नी अंकिता आणि त्यांच्या वयातील अंतराबद्दल विचारले गेले तेव्हा तेव्हा त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “वयात 25 वर्षे अंतर असले तरी आम्हाला यामुळे  काहीही फरक पडत नाही. इतकेच नाही तर वय आमच्यासाठी महत्त्वाचे नाही आहे.”
खरंतर मिलींद सोमणचं हे दुसरं लग्न आहे. याआधी जुलै २००६ मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस मायलेनशी मिलिंद यांनी  लग्नाची गाठ बांधली होती. मात्र ती फार काळ काही टिकली नाही. इतकेच नाही तर माजी मिस इंडिया आणि मॉडेल मधू सप्रेसोबतच्या अफेअरमुळेही मिलींद सोमण हे बरेच दिवस चर्चेत होते.
अंकिता कुंवर ही दिल्लीची राहणारी आहे. इतकेच नाही तर एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रू म्हणून कामाला सुरूवात केली होती. एका मॅरेथाॅनदरम्यानच मिलिंद आणि अंकिता यांची भेट झाली. तिथे ती त्यांच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे २०१५ मध्ये अंकिताने मिलींदसोबत मॅरेथॉनचा टप्पाही पूर्ण केला होता. महत्त्वाचे म्हणजे अंकिताचं हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर चांगलं प्रभूत्व आहे.