मिलिंद सोमण-अंकिता कोनवार लग्नबंधनात

अलिबाग : वृत्तसंस्था

अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची प्रेयसी अंकिता कोनवार यांच्या लग्नाची चर्चा गेले दोन महि महिने रंगली होती. या दोघांनी रविवारी २२ एप्रिलला अलिबागमध्ये विवाहबद्ध झाले. या दोघांचा हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम शनिवारी अगदी साध्या पद्धतीने पार पडला होता.

मिलिंदने आपला लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने करण्याचे ठरवले होते. त्यानुसार लग्नस मारंभासाठी त्यानं निवडक मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित केले होते. आपल्या जवळच्या कुटुंबीयां व्यतिरिक्त मिलिंदच्या सामाजिक कामात जे मित्र सहकार्य करतात, तसेच जे त्याच्या फिटनेसचे चाहते आहेत, अशांनाच मिलिंदने आमंत्रण दिले. त्यापैकी बरेच आमंत्रित शनिवारी अलिबागमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत आज मिलिंद आणि अंकिताचा लग्नसोहळा पार पडला.