#BoycottChineseProducts वर ‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमननं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन कायमच इंस्टावरून इंस्पायरींग पोस्ट शेअर करत असतो. अलीकडेच त्यानं #BoycottChineseProducts वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिलिंदनं सर्व उत्पादनांचा त्याग करण्यास सांगितलं आहे आणि स्वदेशी वस्तूंवर जोर दिला आहे.

मिलिंदनं एक ट्विट शेअर केलं आहे ज्यात लिहिलं आहे की, शरीर आणि आरोग्य दोन्हीही निरोगी ठेवण्याचा एकच उपाय आहे. चीनी बंद. शरीरासाठी देसी गुड आणि राष्ट्रासाठी देसी Goods.” मिलिंद हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच मिलिंदनं सोशलवर एक न्यूड फोटो शेअर केला होता. मिलिंद आणि त्याची गर्लफ्रेंड मधु सप्रे यांनी 1995 मध्ये एक फोटोशुट केलं होतं. एका जाहिरातीसाठी केलेल्या या शुटमध्ये मिलिंद आणि मधु दोघेही न्यूड होते. दोघांनी एकमेकांना जवळ घेतलं होतं आणि त्यांच्या गळ्यात एक अजगरही दिसत होता. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. या फोटोनं सोशलवर खळबळ उडाली होती.

मिलिंदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या फोर मोर शॉर्ट प्लिज या वेब सीरीजमध्ये तो झळकला होता. ही वेब सीरीज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. मिलिंदनं करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती.