मिलिंद सोमन यांनी अंकिताला घेतले जवळ, फोटो झाला VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिटनेस फ्रिक, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमन आणि त्यांची पत्नी अंकिता कुंवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या चाहत्यांना मिलिंद सोमन आणि अंकिता यांचा फोटो भावताना दिसत आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत त्यांचे कौतुकही केले आहे.

अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यात दिसत आहे की, मिलिंद सोमन यांनी अंकिताला आपल्या जवळ घेतलं आहे आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पहात आहेत. हा फोटो पाहूनच दोघांमधील केमिस्ट्री आणि एकमेकांविषयीचे त्यांना किती प्रेम आहे याची प्रचिती कोणालाही येते. हा फोटो शेअर करताना अंकिताने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शन मध्ये अंकिता म्हणते की, “शब्दांपेक्षा डोळे जास्त बोलतात.” या फोटोत दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहे.

अंकिता फोटोला दिलेले कॅप्शन अगदीच चपखल बसते. काही चाहत्यांनी तशी कमेंटही केली आहे. काही चाहत्यांनी या जोडीला कॅम्प्लिमेंट देत त्यांचे कौतुक केले आहे. सध्या हा फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मिलिंद आणि अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाही हे दोघे चर्चेत आले होते. 22 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. याचेच निमित्त साधत दोन्हीही कपलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक अनसीन व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओसोबत त्यांनी छान असं कॅप्शनही दिलं होतं. दोघांनीही एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मिलिंद आणि अंकिता या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांचं लग्न खूपच चर्चेत आलं होतं.