Nude फोटोमुळं झाला होता वाद ! मिलिंद सोमननं सोडलं ‘मौन’, म्हणाला…

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) यानं सोशलवर शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळं नाव वाद निर्माण झाला होता. मिलिंद सोमन विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. आयपीसीमधील कलम 294 आणि आयटी सेक्शनमधील काही कलमांतर्गत ही केस दाखल करण्यात आली होती. यावर आता खुद्द मिलिंदची प्रतिक्रिया आली आहे.

मिलिंदनं वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून एक फोटो शेअर केला होता. यात तो न्यूड समुद्रकिनारी धावताना दिसत होता. काहींनी त्याला ट्रोलही केलं होतं. काहींनी त्याला पाठींबाही दिला होता. आता या प्रकरणी त्यानं मौन सोडलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना मिलिंद म्हणाला, मला अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची माहिती नाही. कोणी मला या बद्दल नाही सांगितलं. मला याबाबत कोणतंही अधिकृत नोटीफिकेशन आलेलं नाही.

न्यूड फोटो बद्दल बोलताना मिलिंद म्हणाला, मी न्यूड फोटोशुट खूप वर्षांपासून करत आलो आहे. जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा चर्चेत होतो. आता प्रत्येक वेगळी रिअ‍ॅक्शन पाहायला मिळते.

स्वत:चा बचाव करत मिलिंद म्हणाला, काय असतो न्यूड माणूस ? आपणा सर्वांना देवानं असंच बनवलं आहे. आपण अनेकांचे असे फोटो नेटवर पाहिले आहेत. सर्वांचं स्वप्न होतं. या प्रकरणी मिलिंदची पत्नीही त्याच्या सोबत उभी आहे. तिनंही पतीचा बचाव केला.