मिलिंद सोमनच्या Nude फोटोवर अभिनेत्री पूजा बेदीची प्रतिक्रिया ! ‘नागा साधूं’चे फोटो शेअर करत म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) यानं सोशलवर शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळं नाव वाद निर्माण झाला आहे. मिलिंद सोमन विरोधात पोलिसांत तक्रार दखल करण्यात आली आहे. आयपीसीमधील कलम 294 आणि आयटी सेक्शनमधील काही कलमांतर्गत ही केस दाखल करण्यात आली आहे. यानंतर काहींनी मिलिंदवर टीका केली तर काहींना त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक कलाकारांनीही यावर मत मांडलं आहे. अशात आता अ‍ॅक्ट्रेस पूजा बेदी (Pooja Bedi) हिनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामळं ती ट्रोल झाली आहे.

पूजा बेदीनं या संदर्भात ट्विट केलं आहे. यात ती म्हणाली आहे की, तिला अभिनेत्याचे फोटो अश्लील वाटत नाही. अश्लीलता तर तुमच्या डोक्यात आहे जे या फोटोवर ओव्हर रिअ‍ॅक्ट करत आहेत. जर न्यूड होणं गुन्हा असेल तर नागा बाबांनाही (Naga sadhu) अटक केली पाहिजे. पूजानं या ट्विटसोबत नागा बाबांचे फोटो शेअर केले आहेत.

सध्या पूजानं शेअर केलेले हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींना मात्र तिला हे उदाहरण देण्यासाठी ट्रोलही केलं आहे. सध्या तिचं ट्विट चांगलंच चर्चेत असल्याचं दिसत आहे.