मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण अभिनयाबरोबर त्याच्या फिटनेसचीही खूप काळजी घेतो. त्याचे सोशल अकाऊंट व्हिडीओ आणि त्याच्या वर्कआउटच्या फोटोंनी भरलेले आहे. अलीकडे मिलिंद सोमणला वेब सीरिज ‘फोर मोर शॉट्स’ मध्ये पाहिले गेले होते. मिलिंदने या वेब सीरिजमध्ये काही इंटिमेट सीन दिले होते. वेब सीरिजमधील मिलिंदच्या इंटिमेट सीनबद्दल आता त्याची पत्नी अंकिता कोंवरची प्रतिक्रिया समोर आली आहे. अलीकडेच मिलिंदने एका मुलाखतीत अंकिताच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले.
पिंकविलाबरोबर बोलताना मिलिंद सोमण म्हणाला की, ‘फोर मोर शॉट्स’ या वेब सीरिजमधील माझे इंटिमेट सीन पाहून ती एकदम कुल होती. पण जेव्हा मला पहिला सीझन मिळाला होता तेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि त्यात इंटिमेट सीन होते. टेबलावर अंडरवेअरमध्ये एक चालतानाचा सीनही होता. हे ऐकून अंकिता म्हणाली की, हे अगदी मजेदार असेल. वास्तविक ती यासाठी खूप उत्साही होती. ‘
याच मुलाखतीत मिलिंद म्हणाला की, ‘लग्नाआधी तो आपली सर्व कामे कोणालाही न विचारता आपल्या मर्जीने करीत असत, पण अंकिताशी त्याचे लग्न झाल्यामुळे तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर डिस्कस करतो. हा त्याच्यामधील एक मोठा बदल आहे, आता फक्त मीच नाही, कोणीतरी आहे जो खूप महत्त्वाचा आहे.’
अलीकडेच मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला आहे. मिलिंदप्रमाणेच अंकिता देखील फिटनेस फ्रीक आहे. अंकिता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशलवर शेअर करत असते. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती तिच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.