‘फिटनेस फ्रिक’ मिलिंद सोमणनं शेअर केला ‘NUDE’ फोटो, पत्नी अंकिता म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता मिलिंद सोमणनं इंस्टाग्रामवरून एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. मिलिंदनं करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती. त्यानं गर्लफ्रेंड सोबत न्यूड फोटोशुट केल्यानं तो वादातही सापडला होता. त्यानं त्याचाच एक न्यूड फोटो शेअर केला आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंदनं 1991 साली हे फोटोशुट केलं आहे. मॉडेलिंगच्या काळातील त्याचा हा न्यूड फोटो आहे. फोटो शेअर करताना मिलिंद म्हणतो, “throwback Thursday” मिलिंदच्या या फोटोवर त्याची पत्नी अंकिता कुंवरनंही कमेंट केली आहे. अंकिता म्हणते, “आणि म्हणूनच तेव्हा मी या जगात आले… हॅलो लव्हर.” अंकितानंही आपल्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिताचा जन्म 1991 साली झाला आहे.

मिलिंद सोमण यांचं वय 54 वर्षे असून अंकिता ही 29 वर्षांची आहे. पारिंपरिक रितीरिवाजाने लग्न केल्यानंतर दोघांनी 11 जुलै 2018 रोजी स्पेनमधील barefoot मध्ये पुन्हा लग्न केलं होतं. मिलिंद सोमन यांच्यासारखंच त्यांची पत्नी अंकिताही फिटनेसबाबत विशेष काळजी घेत असते. हे कपल सोशलवरही चांगलंच सक्रिय असतं. आपल्या वयातील अंतरांमुळे दोघांचं लग्न चर्चेत राहिलं होतं.