मिलिंद सोमनच्या Nude फोटोवर शेखर सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला -‘नुसतंच वय वाढलं, पण अद्याप…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   न्यूड फोटो आणि व्हिडीओंमुळं अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे (Poonam Pandey) ही अडचणीत सापडली होती. यानंतर आता न्यूड फोटोमुळं अभिनेता मिलिंद सोमन (Milind Soman) हादेखील अडचणीत सापडला आहे. एकीकडे पूनम पांडेला अटकेनंतर जामीन मिळाला आहे तर दुसरीकडे आता मिलिंद सोमन विरोधात पोलिसात तक्रार दखल करण्यात आली होती. गोव्यातील बीचवर न्यूड फोटो काढून तो आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी मिलिंद सोमन विरोधात गोवा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) यानं यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

शेखरनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये शेखर म्हणतो, मिलिंदचं वय 55 झालं आहे. परंतु त्याच्या कृती अद्याप लहान मुलांसारख्यच दिसताहेत. उमर पचपन की, हरकतें बचपन की असं त्यानं म्हटलं आहे.

बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन (Milind Soman) यानं नुकताच त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानं सोशलवरून गोव्यात समुद्रकिनारी धावताना न्यूड फोटो शेअर करून चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलं. यानंतर आता गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलिसात मिलिंद सोमन विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आरएसएसचे माजी सरसंघचालक आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर (Subhash Velingkar) यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, अशा स्वैर वागण्यानं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्याची बदनामी होत आहे.