पूनम पांडेनंतर मिलिंद सोमण यांच्याविरोधात FIR दाखल, गोवा बीचवर केले होते न्यूड फोटोशूट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता – मॉडेल मिलिंद सोमण अलीकडेच गोव्यामध्ये बीचवर न्यूड होऊन धावताना दिसले होते. हा फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केला आहे. आता याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हा फोटो त्यांच्या पत्नीने क्लिक केला होता आणि त्याच्या कॅप्शनमध्ये मिलिंद यांनी लिहिले आहे की, ’55 एंड रनिंग.’

वृत्तसंस्था एएनआयच्या अधिकृत ट्विटर हॅंडलच्या ट्विटनुसार, मिलिंद सोमण यांच्याविरुध्द कोलवा पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 294 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 294 अश्लील कृत्य आणि गाण्यांसाठी आहे आणि आयटी कायद्याचे कलम 67 इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील फॉर्म प्रकाशित करणे आणि शेअर करणे विरोधात आहे.

गोवा सुरक्षा मंचने दिलेल्या तक्रारीनंतर ही तक्रार नोंदविण्यात आली आहे. अलीकडेच मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हीच्याविरूद्ध गोव्यात न्यूड शूटिंग केल्याबद्दल एफआयआरही दाखल करण्यात आला होता. पूनम हीच्याविरोधात ही तक्रार सरकारच्या पाणी बांधकाम विभागाद्वारे दिलेल्या तक्रारीनंतर आली होती. या प्रकरणात पूनम पांडे हीला जामीन मिळाला आहे पण मिलिंद यांना या प्रकरणात दिलासा मिळतो का हे पहावे लागेल.

मिलिंद सोमण यांनी वाढदिवसाच्या दिवशी बीचवर न्यूड होऊन धावत असलेला एक फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल बरेच मीम्स तयार झाले होते. अंडरगारमेंट्स गिफ्ट करण्यापासून ते हार्मोन्स आउट ऑफ कन्ट्रोल सारख्या गोष्टी लिहून मिलिंद यांनी शेअर केलेल्या या फोटोची लोकांनी खिल्ली उडविली होती.