Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन –  गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात (Gyarapatti-kotgul jungle) नक्षलवाद्यांच्या (naxalite) विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 26 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) याचा देखील खात्मा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मिलंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) हा ठार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पोलीस नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत पोलीस पथकाचे तीन जवान जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी पोलीस पथकाने मोठे कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) केले.
या मोहिमेत जवळपास 26 लक्षलवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.
यामध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) देखील ठार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. परंतु तेलतुंबडे यांच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळीला खिळ बसल्याची चर्चा आहे.

 

कोण आहे मिलिंद तेलतुंबडे ?

 

मिलिंद तेलतुंबडे हा लेखक आणि प्रध्यापक आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांचा लहान भाऊ आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील आहे. तो मागील कित्येक वर्षापासून नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे.
तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे.

 

Web Title : Milind Teltumbde | Big naxalite leader milind teltumbde killed in police naxal clash in gadchiroli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | कोणार्क एक्सप्रेसमधून 8 किलो गांजा जप्त

Aadhaar card number | तुमचा आधार नंबर सोशल मीडियावर शेअर करताय?, मग जाणून घ्या UIDAI च्या महत्वाच्या सुचना

Crime News | पत्नीनं घरात लावला छुपा कॅमेरा, पतीचं मैत्रिणीशी असलेलं ‘झेंगाट’ झालं CCTV मध्ये कैद अन्…