Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

0
235
Military Recruitment for Woman In Pune
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सैन्यदलात पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आणि अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत महिलांसाठी लष्करी पोलीस भरती मेळाव्याचे (Military Recruitment for Woman) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 6 डिसेंबर ते रविवार 11 डिसेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. खडकी येथील बीईजी अँड सेंटर येथे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे. देशसेवेसाठी उत्सुक असलेल्या तरुणींना यात संधी देण्यात येणार आहे. तसेच देशाच्या सेवेत आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलादेखील कुठे मागे नाहीत, हे दाखविण्यासाठी महिलांनाही लष्करात भरतीची (Military Recruitment for Woman) संधी देण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया शारीरिक, वैद्यकीय आणि लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.
शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत यशस्वीपणे पार झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जाणार आहे.
तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड (Military Recruitment for Woman) केली जाणार आहे.
त्यासाठी मेरीट यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात आणि लष्करी पोलीस विभागात अग्निवीर म्हणून दाखल करून घेतले जाणार आहे. या भरती मेळाव्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Military Recruitment for Woman In Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात