भारतीय लष्करात केली जाणार 1 लाख सैनिकांची कपात, CDS General Bipin Rawat यांनी सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतीय लष्कर स्वत:ला जास्त आधुनिक आणि प्रभावी बनवण्याच्या तयारीत आहे. भारतीय लष्करात पुढील काही वर्षात एक लाख सैनिकांची कपात केली जाईल आणि यातून होणार्‍या बचतीचा वापर लष्कराला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी केला जाईल, असा दावा करण्यात आला आहे. सध्या भारतीय लष्करात जवळपास 14 लाख सैनिक आहेत आणि हे संख्याबळ केवळ चीनच्या पाठीमागे आहे. आता यामध्ये त्या सैनिकांची संख्या कमी केली जाईल जे थेट सैनिकी कारवाईत भाग घेत नाहीत, तर सर्व्हिस, मॅकेनिकसारखे काम करतात.

कमी केले जातील 1 लाख सैनिक

यामुळे सीमेवर तैनात सैनिकांना चांगली हत्यारे आणि नवीन उपकरण मिळतील. संरक्षण प्रकरणांच्या संसदीय समितीने मागील महिन्यातच आपला रिपोर्ट सभागृहात सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी आपले मत मांडत म्हटले होते की, आता लष्कर तंत्रज्ञानावर जास्त लक्ष देणार आहे आणि नवीन पद्धतीच्या युद्धासाठी तयार होणार आहे.

त्यांनी म्हटले, अगोदर लष्कर दूरच्या परिसरात तैनात होत होते, तेव्हा त्यांना आपली सर्व व्यवस्था स्वत:ला करावी लागत होती, परंतु आता इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्याने त्याची आवश्यकता राहिलेली नाही. अगोदर लष्करात बेस रिपेयर डिपो असत, ज्यामध्ये गाड्यांची दुरूस्ती केली जात होती. परंतु आता त्यांना आऊटसोर्स केले जाते. जसे की जर टाटा कंपनीची एखादी गाडी आहे, तर ती दुरूस्तीसाठी टाटाच्या वर्कशॉपमध्ये पाठवली जाऊ शकते. यातून जी बचत होईल तिच्यातून लष्कर स्पेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवीन तंत्रज्ञानावर खर्च करेल, जे युद्धाच्या नवीन पद्धतीसाठी आवश्यक आहे.