सुरकुत्या अन् टॅनिंग दूर करण्यासाठी ‘असा’ करा मलईचा वापर ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  उन्हाळ्यातील कडक उन्हामुळं किंवा एरवी जास्त बाहेर उन्हात जास्त फिरल्यानंतर अनेकांना त्वचेचा कोरडेपणा, काळेपणा आणि टॅनिंगअशा समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी मलईचा खूप लाभ होतो. यामुळं त्वचा मॉईश्चराईज होते. मलईमुळं त्वचेवर फॅट्सचं एक कोटींग तयार होतं. यामुळं धूळ, ऊन यापासून त्वचेचं नुकसानं होत नाही. यासाठी मलईचा वापर कसा करायचा आणि याचे आणखी काय फायदे होतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

असा करा मलईचा वापर

त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी मलई आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा. 10 मिनिटांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. यानंतर त्वचा पाण्यानं धुवून स्वच्छ करा. यामुळं डेड स्कीन सेल्स आणि टॅनिंग दूर होतं.

असा वाढवा त्वचेचा उजळपणा

मलईमध्ये बेसन एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहार सुकल्यानंतर पाण्यानं धुवून काढा. याव्यतिरीक्त तुम्ही मलई आणि हळद यांचाही वापर करू शकता. दोन्ही पैकी कोणताही उपाय केला तर त्वचा उजळ होते.

सुरकुत्या दूर होतात

मलईमुळं त्वचा मऊ राहते. यामुळं ओपन पोर्सची समस्याही दूर होते. मलई आणि मध एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावत सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. यामुळं ओपन पोर्स दूर होतील. याशिवाय ब्लॅकहेड्स पासूनही तुमची सुटका होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ टाळावेत.