Milk Cream Benefits | चेहर्‍यावर मलई लावल्याने होतात 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Milk Cream Benefits | प्रत्येकजण आपली त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार बनविण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतो. महागड्या आणि स्वस्त उत्पादनांचा वापर केल्याने कधीकधी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. पण स्वयंपाक घरात उपलब्ध मलई चेहर्‍यावर लावणे हा जबरदस्त उपाय आहे. मलईमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे तुमच्या चेहर्‍यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मलई त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. मलईमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. चेहर्‍यावर मलई लावून चेहर्‍याचे सौंदर्य वाढवता येते. (Milk Cream Benefits)

 

चेहर्‍याला मलई लावण्याचे 5 फायदे (Five Benefits Of Milk Cream)

1. स्कीनला मॉयश्चराईज करते (Moisturizes The Skin)
स्टाइलक्रेझच्या मते, दुधाची मलई फॅटयुक्त असते जी तुमच्या त्वचेला मॉयश्चराईज करते. मलईमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते जे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. यामध्ये अत्यंत पौष्टिक घटक आणि खनिजे असतात ज्यामुळे त्वचा निरोगी आणि मुलायम बनते.

 

2. त्वचेची घाण काढून टाकते मलई (Milk Cream Removes The Dirt Of The Skin)
मलई त्वचा डिटॉक्स करते. त्वचेत जमलेले किटाणू काढून टाकून त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनवते. मलईमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेचे टॅनिंग दूर करतात. (Milk Cream Benefits)

3. मलईने नॅचरल ग्लो (Milk Cream to Natural Glow)
उन्हात तुमच्या त्वचेवर टॅनिंगची समस्या वाढते, यापासून सुटका मिळवण्यासाठी मलई वापरणे हा एक चांगला उपाय आहे. मलई त्वचेला पोषण देते आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक आणते.

 

4. तरुण दिसण्यास मदत करते (Helps You Look Young)
कोरड्या आणि निस्तेज त्वचेमुळे तुम्ही वयाने मोठे दिसू लागता. मलई त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा तरुण दिसण्यास मदत करते. त्यामुळे सुरकुत्याही कमी होतात.

 

5. सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून संरक्षण (Protection From Ultraviolet Rays Of The Sun)
मलाई त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. सनस्क्रीन म्हणून ती वापरू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Milk Cream Benefits | skin benefits of milk cream

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Khadakwasla Dam | धरणक्षेत्रांत पावसाला सुरूवात ! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौक उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी आजपासून

Ajit Pawar | ‘नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतात कारण..’ अजित पवारांचा ‘दादा स्टाईल’ बावनकुळेंना टोला