दुधवाल्याचा अजब कारभार ; दुधाच्या ‘कॅन’ मधून करत होता दारूची तस्करी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी एका अशा संशयित तस्कराला अटक केली जो उघडपणे बऱ्याच महिन्यांपासून दारूची तस्करी करत होता. त्याच्यावर कधीच कोणी संशय घेतला नाही. पोलिसांच्या खबऱ्याने माहिती दिल्यावर या तस्कराला पकडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी एक गोपनीय माहिती मिळाली होती की हरियाणाचा रहिवासी असलेला एक व्यक्ती दुधवाल्याचे रूप परिधान करून दारूची तस्करी करत होता. तो दुधाच्या मोठमोठ्या कॅनमध्ये दारू भरून नेत होता. दारूचे हे कॅन तो आरामात घेऊन जात होता.

पोलिसांना यासंबंधी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हरियाणातून येणाऱ्या अनेक दुधवाल्यांवर नजर ठेवली. २२ जुलैला एका संशयित दुधवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दुधवाल्याचे कॅन तपासल्यानंतर पोलीस अवाक झाले. कारण त्या कॅनमध्ये दुधाच्या जागी दारू होती. पकडण्यात आलेल्या दुधावल्याचे नाव जवाहर असे आहे. जवाहर हरियाणाचा रहिवासी आहे. तो फरिदाबादवरुन दारू घेऊन येत होता आणि दिल्लीला जाऊन विकत होता. जवाहर पहिल्यांदा दूधविक्रीचेच काम करत होता पण अधिक पैसे कमविण्यासाठी त्याने दारूच्या अवैध व्यवहाराचा मार्ग अवलंबला.

आरोग्यविषयक वृत्त