सकाळच्या नाष्यात पहिलं ड्रिंक म्हणून दूध जास्त हेल्दी की ज्यूस ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   काही लोक सकाळी नाश्यात दूध घेतात तर काही लोक संत्र्याचा ज्यूस घेतात. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो यातील कोणतं ड्रिंक पहिल्यांदा घेणं चांगलं आहे. आधी आपण दोन्हींचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊयात मग काय चांगलं आहे तेही माहित करून घेऊ.

दुध पिल्याचे फायदे –

दुधात जास्त प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12 आणि हेल्दी फॅट्स असतात. याशिवाय याचे शरीराला अनेक फायदेही होतात. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी दूध केव्हाही चांगलं आहे. परंतु यासाठी दुधाच्या क्वालिटीची तुम्हाला गॅरंटी हवी.

काय आहे नुकसान ?

– यातील सॅच्युरेटेड फॅट्समुळं लठ्ठपणा आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका निर्माण होतो.

– जास्त दुधासाठी जनावरांना दिलेल्या इंजेक्शनमुळं यातील केमिकलचा प्रभाव शरीरावर पडतो.

संत्र्याच्या ज्यूजचे फायदे –

– शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मिळतात. यामुळं इम्युनिटी वाढते.

– व्हिटॅमिन सीमुळं प्रदूषण आणि घातक किरणांपासून बचाव होतो. यासाठी घरात बनवलेला फ्रेश ज्यूस असावा.

काय आहे नुकसान ?

– पॅकेज्ड ज्युसमध्ये शुगर जास्त असते.
– हा ज्युस फ्रेश नसतो.
– यात केमिकल्सही असतात.
– ज्यूस जरी फ्रेश असेल तरी फळातून ज्यूस काढल्यानं यातील पोषक तत्व निघून जातात.

ज्यूसपेक्षा दूध अधिक चांगलं

नाष्यात दूध घेणं जास्त हेल्दी आहे. कारण यातील कॅल्शियमुळं हाडं मजबूत राहतात. दात मजबूत राहतात. दुधाच्या सेवानानं पोटही भरलेलं राहतं. लवकर भूकही लागत नाही. यामुळं दिवसभर अनहेल्दी पदार्थांपासूनही तुम्ही दूर राहता. ज्यूस पिल्यास पोट जास्त वेळ भरलेलं राहत नाही. याशिाय दुधात भरपूर हेल्दी प्रोटीन असतात. यामुळं दुधाच्या सेवनाचे शरीराला जास्त फायदे होतात.