Milk Price | अमूल पाठोपाठ मदर डेअरीनेही केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडलेली असतानाच सर्वसामान्यांना आता महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. इंधन दरवाढ, अन्नधान्य, भाजीपाल्याचे दर वाढले असतानाच आता दुधाची त्यात भर (Milk Price) पडली आहे. एक जुलैपासून अमूलने सर्व राज्यांमध्ये नवे दर लागू केले असून त्यामध्ये २ रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दरवाढीची घोषणा केली आहे. मदर डेअरीने दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ केली असून हि दरवाढ फक्त दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमध्येच (NCR) आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या ग्राहकांना सध्या थोडासा दिलासा मिळाला आहे. ११ जुलैपासून म्हणजे उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. Milk Price | mother dairy increased prices all its variant milks rs 2 rupees liter

गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे दूध उत्पादनावरही (Milk products) परिणाम झाला असून यापूर्वी २०१९ मध्ये दुधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सध्या केलेली दरवाढ सर्व प्रकारच्या दूधावर लागू असणार आहे असं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध ५५ रुपयांऐवजी ५७ रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाले आहेत. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे. अमूलकडून जवळपास दीड वर्षानंतर उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमतीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे अमूल गोल्डची किंमत ५८ रुपये प्रति लीटर झाली असून हे नवे दर दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर सर्वच राज्यांमध्ये लागू झाले आहेत.

 

गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघाने (Gokul Milk Union) दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी हसन मुश्रीफही उपस्थित होते. म्हशीच्या दुधाला २ रुपये तर गायीच्या दुधाला १ रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. हसन मुश्रीफ म्हणाले की, दूध खरेदी दरवाढ झाल्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असून कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागांत दूध विक्री दरातही वाढ करण्यात येणार आहे.

Web Title : Milk Price | mother dairy increased prices all its variant milks rs 2 rupees liter

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जर तुमच्याकडे आहे SBI चे ‘हे’ खाते तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Petrol Diesel Price Today | इंधन दरवाढ सुरूच; पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागले

Pune Metro। पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार; सप्टेंबरपर्यंत मेट्रोची कामे गतीने वाढवण्याचा प्रयत्न, महामेट्रोची माहिती