दूध : जेजुरीत भाजपाच्या वतीने आंदोलन

जेजुरी  : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  जेजुरी येथे सरकारचा निषेध करीत पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने दूध वाटून आंदोलन करण्यात आले.

भाजपाच्या वतीने सरकार विरोधात शेतकऱयांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरु असून शनिवार दि 1 रोजी जेजुरी येथील छत्रपती शिवाजी चौकात पुरंदर तालुका,जेजुरी शहर भाजपा,रासप,व मित्र पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले .आंदोलना पूर्वी लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

राज्यातील आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांना लिटर मागे 10 रुपये शासनाने अनुदान द्यावे,दुध भुकटी साठी 50 रुपये अनुदान द्यावे यासाठी संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडण्यात आले असून,सरकारने या कडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असे भाजपचे नेते निलेश यांनी सांगितले . यावेळी पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष आर एन जगताप पदाधिकारी निलेश जगताप, श्रीकांत ताम्हाणे ,श्रीकांत थिटे, माहिलाध्यक्षा अलका शिंदे,जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, पदाधिकारी नागनाथ झगडे,गणेश भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like