दुधाला लिटरमागे पाच रुपये दरवाढीची अंमलबजावणी उद्यापासून 

मुंबई : वृत्तसंस्था

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला दर मिळावा म्हणून आंदोलन केले होतो. यानंतर सरकारने दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर ( लिटरमागे 5 रुपये) देण्याची घोषणा केली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच एक आॅगस्टपासून होणार आहे. संध्याकाळपर्यंत याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B073VQKQBK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbecddb3-94c9-11e8-96d7-e514389f4d9e’]
नागपूर पावसाळी अधिवेशनात 21 जुलैपासून अंमलबजावणीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र खाजगी, तसेच शासनाच्या दूध सहकारी संस्थांनी अंमलबजावणीसाठी तांत्रिक कारणामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. ही वेळ वाढवून दिल्यामुळे अंमलबजावणीला उशीर झाला होता.

याबाबत दुग्धविकास विभाग आणि संबंधित दूध संघाची बैठक झाली. बैठकीदरम्यान या विषयावर चर्चा करण्यात आली असून, उद्यापासून अंमलबजावणीचा निर्णय झाला. मात्र तांत्रिक कारणांमुळे यासाठी उशीर झाला. अखेर शेतकऱ्यांना उद्यापासून दुधाला अधिकचा दर मिळणार आहे.