Satara Crime | दुध टँकरची 6 वाहनांना धडक; पुण्यातील दोघांचा मृत्यू

शिरवळ : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | महामार्गावर रस्त्याच्या मधोमध टेम्पो आणि स्कॉपिओ चालक कोणतेही भान न ठेवता भांडत राहिले, त्यामुळे वाहनांची रांग लागली. कोल्हापूरहून पुण्याकडे भरधाव जाणाऱ्या दुध टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे असलेल्या ६ वाहनांना एका पाठोपाठ धडक दिली. (Satara Crime) या भीषण अपघातात (Accident) पुण्यातील दोघे ठार झाले तर ३ जण जखमी झाले आहेत.

संजय कुलकर्णी (वय ५४, रा. कर्वेनगर) आणि विजय कोळेकर (वय ५७, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी मृत्यु पावलेल्या दोघांची नावे आहेत. बंगलोर -पुणे महामार्गावर (Bangalore-Pune Highway) शिरवळजवळील धनगरवाडी गावाजवळ स्कॉपिओ आणि टेम्पो चालकांमध्ये मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वादावादी सुरु होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.

त्याचवेळी कोल्हापूरहून (Kolhapur) पुण्याकडे दुधाचा टँकर (Milk tanker) वेगाने चालला होता. समोरची वाहनांची गर्दी पाहूनही त्याला वेग कमी करताना आला नाही. त्याने एका पाठोपाठ उभ्या असलेल्या इनोव्हा, वेगॅनार, स्कॉपिओ, टेम्पो अशा ६ वाहनांना धडक दिली. त्यात वेगॅनारमधील पुण्यातील दोघांचा मृत्यु (Death) झाला.

हा अपघात इतका भीषण होता की टँकरने सर्वप्रथम याच वेगॅनारला धडक दिली होती.
त्यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. वेगॅनारमधील दोघांचे मृतदेह गॅस कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
महामार्गावर कोणतेही नियमांचे पालन न करता रस्त्याच्या मधोमध टेम्पोचालक आणि स्कॉपिओ मधील लोकांची भांडणे या अपघाताला निमित्त झाली.

Web Title : Satara Crime | Milk tanker hits 6 vehicles pune satara highway

 

Sangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात;
कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू

Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया,
जाणून घ्या त्यांचे फायदे

Bombay High Court | चित्रपट, गाण्यांच्या वाहिन्यांसारखी सरकार शिक्षणासाठी पूर्णवेळ वाहिनी का सुरु करत नाही?