पुणे शहरात तीन ठिकाणी दुधाचे टँकर फोडले, आंदोलनकर्ते अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यामध्ये दुधदर वाढीसाठी आंदोलन सुरु आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे दुधाचे टँकर फोडण्यात आले आहेत. दरम्यान, काल संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. पुणे शहरात येणारे तीन दुधाचे टँकर अडवून टँकरची तोडफोड करुन दुध रस्त्यावर फेकण्यात आल्याच्या घडना घडल्या आहेत. पुणे पोलिसांनी दुधाचे टँकरची तोडफोड करुन दूध रस्त्यावर फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक केली.
[amazon_link asins=’B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c340d65a-8a90-11e8-91e6-4fea99251a8a’]

मंगळवारी (दि.१७) रात्री एकच्या सुमारास एसएनडीटी कॉलेज जवळ दुधाचे कॅरेट घेऊन जाणारा टेम्पो चार ते पाच जणांनी अडवला. या टेम्पोची तोडफोड करुन कॅरेटमधील दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले. टेम्पो चालक प्रकाश धोंडीबा बिरामणे (वय-४४ रा. नवी मुंबई) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. जितेश जया शेट्टी, रोनक जया शेट्टी या दोघांना अटक केली आहे तर विनोद उर्फ काकासाहेब श्रीराम चव्हाण, स्वप्नील सुरेश पाटील यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत टेम्पोचे पाच हजारांचे नुकसान झाले आहे.

दुसरी घटना अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सिद्धलींगप्पा सिद्रामप्पा मालीपाटील (वय-३९ रा. कात्रज) हे निलगिरी अपार्टमेंट येथून दूधाचा टँकर घेऊन जात होते. त्यावेळी चार जणांच्या टोळक्याने टँकर अडवून टँकरच्या पुढील काचेवर दगड मारुन काच फोडली. दरम्यान, साध्या वेशात पोलिस घटनस्थळी आले असता चार जणांना अटक करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B077PWK5BT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8a1a2f4-8a90-11e8-853d-8f1e1e00c85d’]

तर  पुणे-सोलापूर रोडवर किर्लोस्कर उड्डाणपुलाजवळ कारमधून आलेल्या सात जणांनी पुण्याच्या दिशेने येणारा टेम्पो अडवला. या टोळक्याने टेम्पोची तोडफोड करुन टेम्पोमधील दूध रस्त्यावर फेकून दिले. दिपक सदाशिव ठोगे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून, पोलिसांनी अमोल सिद्धराम हिप्परगे, अमर सादिक पाटील या दोघांना अटक केली आहे. तर त्यांचे इतर पाच साथिदार पळून गेले. हा प्रकार रात्री पावणे दोनच्या सुमारास घडला