सनमडी येथे दूध रस्त्यावर ओतून आंदोलन

येळवी: पोलीसनामा ऑनलाईन

सनमडी (जत)येथे गाईच्या दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला असून शासनाने दूध दरवाढ करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.शासनाचा निषेध म्हणून सनमडी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व दूध उत्पादकांनी रस्त्यावर १००लीटर दूध ओतून आंदोलन केले.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dab3161b-88c3-11e8-b455-1d783d0c1b15′]

यावेळी दूध उत्पादक शेतकरी म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या हिता विरोधी असून भांडवलदाराना जोपासणारे राज्य सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे एकही दिलासादायक धोरण राबवले नाहीआणि  निर्णय घेतला नाही.दूधाचे दर प्रति लीटर २७ रुपयेवरुन १६ रुपये पर्यंत खाली आला आहे. याकारणाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. पाणी व दूध यांच्या तूलनेत पाण्याच्या बाटलीचे दर जास्त आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनगु सलगर,सदाशिव सलगर, शरद पवार, दशरथ मोटे , शिवाजी सलगर, राजु बडंगर, उत्तम महारनुर,भिमराव पाटील, सागर वाघमोडे, चाँद आत्तार यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.