Milkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोविडमुळे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्या पत्नी निर्मल कौर सिंग (Nirmal Kaur Singh) यांचे कोविडमुळे निधन झाले आहे. निर्मल सिंग या 85 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसापासून त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आला होता त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंह (Milkha Singh) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. (Milkha Singhs wife Nirmal Kaur Singh dies due to Covid-19).

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

निर्मल कौर सिंग (Nirmal Kaur Singh) या पंजाब सरकारच्या खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. मागील काही दिवसापूर्वी निर्मल सिंग यांचे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 26 मे रोजी त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले. 30 मे रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य कक्षातून ICU मध्ये दाखल केलं होतं. परंतु, त्यातही त्यांची ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत होती. त्यानंतर डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. सध्या मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्यावर देखील उपचार सुरू असून मिल्खा सिंग यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

 

Wab Title :- milkha singhs wife nirmal kaur dies due to covid 19

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा