सोमवती अमावस्या यात्रे निमित्त जेजुरीत लाखो भाविक

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – श्री क्षेत्र जेजुरी, महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरीचा खंडोबाराया, आज जेजुरीत सोमवती अमावस्या निमित्त जेजुरी गडावर लाखो भाविकांनी भंडार खोबरे उधळत येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजर करत दर्शन घेतले.

या यात्रेत खंडोबा देवाची पालखी ही खंडोबा गडावरून कऱ्हा स्नानासाठी निघते. आज पहाटे 3 वाजता पालखी खंडोबा गडावरून कऱ्हा नदीकडे प्रस्तान केले. त्या पालखीत खंडोबा देवाच्या मूर्ती घेऊन समस्त गावकरी, खांदेकरी, मानकरी, पुजारी हे असंख्य भाविकांन समवेत पालखी कऱ्हा स्नानाला कऱ्हा नदीवर घेऊन जातात. मूर्ती स्नानानंतर देवाची महाआरती केली जाते.

Visit : Policenama.com