शाळकरी मुलाच्या बॅगेत सापडले पुस्तका ऐवजी लाखोची रक्कम

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – विरार जवळील वैतरणा रेल्वे स्थानकात एका ७ वर्षाच्या शाळकरी मुलाच्या बॅगेमध्ये तब्बल ६ लाख ४८ हजार ६४० रुपयांची रोडक सापडली. सात वर्षाच्या मुलाजवळ एवढी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार गुरुवारी (दि.२४) रात्री पावणे नऊच्या सुमारास वैतरणा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडला.

वैतरणा येतील तुषार पाटील हा तरुण कामानिमित्त विरार येथ जात होता. त्यावेळी त्याचे लक्ष रेल्वेत बसलेल्या एका सात वर्षाच्या मुलाकडे गेले. त्याला मुलाचा संशय आल्याने त्याने त्याची बॅग तपासली. त्यावेळी त्यामध्ये पुस्तकांऐवजी नोटांचे बंडले दिसली. यामुळे त्याचा संशय बळावल्याने त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

मुलाकडे चौकशी केली असता त्याने आपण नालासोपारा पूर्वेच्या अन्सारी नगरमध्ये राहत असल्याचेही सांगितले आहे. तुषारने या संपूर्ण प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. हा मुलगा वैतरणा रेल्वेस्थानकात कसा आला ? व त्याच्याकडे येवढी मोठी रक्कम कशी आली ? हवाला रॅकेटसाठी या मुलाचा वापर केला जात होता का ? असे अनेक प्रश्न लोहमार्ग पोलिसांपुढे निर्माण झाले आहेत. वसई लोहमार्ग पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

पिझ्झा थंड झाला म्हणून डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार

चंदिगढ : ऑर्डर केलेला पिझ्झा डिलिव्हर करायला उशीर झाल्याने तो थंड झाला. थंड पिझ्झा मिळाल्याने एका तरुणाने डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंजाबमधील खरार शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी पोलिसांनी तरुणाला अटक करुन पिस्टल जप्त केली आहे.

सनम सेटीया या 21 वर्षीय तरुणाने डॉमिनोजमधून दोन पिझ्झा व चीझ गार्लिक ब्रेड मागवले होते. मात्र ट्रॅफिकमुळे डॉमिनोजच्या डिलिव्हरी बॉयला पिझ्झा पोहचविण्यास उशीर झाला. त्यावरून सनम डिलिव्हरी बॉयशी भांडू लागला व त्याने पिझ्झा थंड झाल्याने मी पैसे देणार नाही असे सांगितले. त्यानंतर सनमने डिलिव्हरी बॉयला त्यांच्या मॅनेजरला फोन लावून द्यायला सांगितले. मॅनेजर जसबीरसोबत देखील सनमचे भांडण झाले.

सनम पैसे द्यायला तयार नसल्याने जसबीर स्वत: तेथे आला. त्या दोघांचे भांडण ऐवढे वाढले की सनमने त्याच्याकडील बंदूकीने जसबीर व त्या डिलिव्हरी बॉयवर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर जसबीर व त्या डिलिव्हरी बॉयने तेथून पळ काढला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सनमला अटक करत बंदूक जप्त केली.