स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी लाखोंचा गांजा जप्त केला

धुळे : पोलीसनामा न्युज ऑनलाईन – नगाव बारी परिसरात आज दुपारी टाकलेल्या छाप्यात 250/300 पोती गांजा जप्त केला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की नगावबारी परिसरातील बिलाडी रोड कडे जाणाऱ्या कच्या रस्त्याकडील कंपाऊंड मधील मोकळ्या जागेत जमिनीखाली तळ घर तयार करुन या तळ घरात स्वतःचा जादा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी दडवून ठेवलेला अंदाजे 250/300 पोती माल कोरडा गांजा आज दुपारी एक पथक तयार करून सदर जागेवर छापा टाकून तेथे असलेला तरुण याला ताब्यात घेत माल ही जप्त केला.
गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचे समजते तळ घरात लपविलेला माल मजूरांच्या मदतीने बाहेर काढून मोजणी करण्याचे काम सुरु होते.

उशीरा पर्यत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई. अप्पर पोलीस अधिकारी राजू भुजबळ, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिस अधिकारी हेमंत पाटील पीएसआय रामकृष्ण पाटील हेडकॉन्स्टेबल रफिक पठाण ,प्रभाकर बैसाणे,श्रीकांत पाटील, गौतम पाटील,राहुल सानप ,मनोज बागुल, केतन पाटील आदी हि यांनी कामगीरी बजावली आहे.