‘PNB’ कडून कोट्यवधी ग्राहकांना ‘गिफ्ट’, ‘गृह’ आणि ‘वाहन’ कर्जावर मिळाणार मोठी ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही या महिन्यात घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी गृह कर्ज आणि वाहन कर्जावर फेस्टिवल बोनाजा ऑफर सुरु केली आहे.

तारणावर कर्ज घेतल्यास मिळणार सवलत –
पीएनबीने सोशल मिडियावर दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला जीरो प्रोसेसिंग आणि डॉक्युमेंटेशन शुल्कावर गृह आणि वाहन कर्ज मिळू शकते. याशिवाय तारण कर्ज घेतल्यास 50 टक्के सूट देण्यात येते. यात तुम्हाला तुमची संपत्ती बँकेकडे तारण ठेवावी लागते. तारण कर्जची रक्कम तुमच्या प्रॉपर्टीच्या स्थितीवर आणि बँकच्या लोन पॉलिसीवर अवलंबून आहे.

मिळणार उत्तम ऑफर्स –
बँकेकडून जेव्हा कर्ज देण्यात येते तेव्हा त्याबदल्यात एक मोठी प्रोसेसिंग फी दिली जाते. ही रक्कम बँकेतून घेत असलेल्या कर्जाच्या 1 टक्क्याने असते. त्यामुळे तुम्ही जर गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर पीएनबीची ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/