MIMचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले, पक्षाच्या उमेदवाराविरोधातच घोषणाबाजी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणूकांच्या प्रचारफेऱ्या सुरु असताना औरंगाबादमध्ये एकाच पक्षाच्या दोन नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकात भिडले. आज प्रचार फेरीच्या दरम्यान औरंगबादमध्ये एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले.

औरंगाबाद मध्ये मतदारसंघातून एमआयएमने नासिर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. परंतू नाराज उमेदवार जावेद कुरेशी यांचे कार्यकर्ते संतापात आहेत. आज प्रचारादरम्यान नासिर सिद्दीकी आणि जावेद कुरेशी या दोन्ही नेत्याचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले.

ही घटना औरंगाबाद पैठण गेट येथे घडली. प्रचाराची रॅली जात असताना एमआयएममध्ये नाराज असलेल्या जावेद कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराविरोधात घोषणाबाजी दिल्याने गोंधळ उडाला. यामुळे एमआयएममध्ये सर्वकाही अलबेल आहे असे दिसत नाही. यामुळे जावेद कुरेशी यांचे कार्यकर्ते नासिर सिद्दीकी यांच्यासाठी प्रचार करताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूकीआधीच पक्षांतर्गत धूसपूस पाहायला मिळत आहे.

Visit : Policenama.com