सोलापूरातील ‘एमआयएम’ नगरसेवकाला खून प्रकरणात ‘अटक’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील विजयपुरातील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांच्या खून प्रकरणातील आरोपी ‘एमआयएम’चा नगरसेवक तौफिक शेख याला आज कर्नाटक पोलिसांनी अटक केली. घटनेनंतर तौफिक शेख हा फरार झाला होता. त्याला आणि इतर सहका-यांना पकडण्यासाठी पोलीसांची चार पथके शोध घेत होती.

काँग्रेस पदाधिकारी रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरणात एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेखला अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूर परिसरातून केली तौफिक शेखला अटक केली. आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा पडेकनूर यांचा खून करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण
कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांनी २२ एप्रिल रोजी सोलापूरचे एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख याच्याविरुद्ध सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तर तौफिक शेख याच्या पत्नीने देखील रेश्मा पडेकनूर व तिचा पती बंदेनवाज पडेकनूर या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेश्मा पडेकनूर यांना सतत धमक्या येत होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे काहीजण आले होते. त्यांच्याबरोबर त्या गेल्या होत्या. त्या रात्रभर न आल्याने त्यांचे पती बंदेनवाज यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता.

त्यानंतर विजयपूर जिल्ह्यातील कोलम येथे पुलाच्या खाली रेश्मा पडेकनूर यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मयत रेश्मा पडेकनूर यांचे पती बंदेनवाज पडेकनूर यांनी कोलार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून सोलापूरचे ‘एमआयएम’चे नगरसेवक तौफिक शेखसह सहा जणांविरुद्ध रेश्मा पडेकनूर यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like