“हिंदू नामर्द नाही, औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची धमक हिंदूंच्या मणगटात” : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडण्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला. तेव्हा त्यांनी कहर करत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला.

या घटनेवर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रेलेखातून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सर्वांसाठी हा इशारा आहे, असं उद्धव ठाकरेंनी अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एमआयएणवर टीका केली.

हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘ओवेसी’ पक्षाच्या औरंगाबादी नगरसेवकांनी गोंधळ घातला.

खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा राडा सुरू झाला. झोंबाझोंबी व राजदंड पळवून नेण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. ओवेसी पक्षाचा पालिकेतील नेता नासेर सिद्दिकी याचे वर्तन एखाद्या गुंडासारखे होते. त्याला व त्याच्या सोबत गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकांना अक्षरशः उचलून आणि फरफटत बाहेर काढावे लागले.

सभागृहात अभूतपूर्व गोंधळ लोकांच्या प्रश्नांवर किंवा राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर झाला नाही, तर जलील यांच्या अपघाती विजयाचे अभिनंदन करावे यासाठी होता. हा गोंधळ पाहून त्याच मातीत गाडलेला औरंगजेबही कबरीतून आनंदाने टाळ्या वाजवीत असेल व ज्यांच्यामुळे हा विजयी अपघात घडून संभाजीनगरवर हिरवा फडकला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी अल्लाकडे दुवा मागत असेल, अशी भूमिका त्यांनी यातून व्यक्त केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट