मोदी-ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली, ओवेसींचा ‘टोला’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका अहवालाचा दाखला देत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली गळाभेट कामी आली नाही. म्हणूनच धार्मिक स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील संस्था युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने भारताला पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासोबत यादीत ठेवले आहे, असे ओवेसी म्हणाले.

युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमनं भारतावर बंधनं घालण्याची शिफारस केली असल्याचे ओवेसी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केल्यानंतरही युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमच्या अहवालाने भारताला पाकिस्तान, उत्तर कोरिया, सीरिया या देशांसोबत उभे केले आहे.

याव्यतिरिक्त त्यांनी भारतावर बंधन घालण्याची शिफारसही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची गळाभेट कामी आली नाही हे यावरून सिद्ध होत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने सर्वाधिक धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे. ओवेसींनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्या भारत सरकारच्या काही संस्था आणि त्यांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात यावी, त्यांची संपत्ती सीज करण्यात यावी आणि त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात यावी असे म्हटले आहे.