इम्तियाज जलीलांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्‍तव्याने नवा ‘संभ्रम’ !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – अलीकडेच वंचित बहुजन आघाडीच्या काही उमेदावारांची नावे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली होती. यानंतर आजच एमआयएमनेही आपले 5 उमेदवारी जाहीर केले आहेत. जागावटपावरून दोन्ही पक्षात ठिणगी पडली असताना आता दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात होतं. आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासजार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्याने नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, “एमआयएमने कोणतंही लॉक लावलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला आदेश करावा. मी त्यांच्या आदेशाचं पालन करेन. आजही मी आंबेडकरांना वंचितचे सर्वेसर्वा मानतो. शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आदेशाची वाट पहात राहिन.” जागावाटपावरून जलील यांनी आंबेडकरांवर टीका केली होती. परंतु आता मात्र ते जे काही बोलत आहेत त्याने नवा संभ्रम निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा वंचितचं सूत जुळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला 8 जागांची ऑफर दिली. त्यांनी आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही असं सांगत एमआयएम वंचितमधून बाहेर पडली होती. जलील यांनी स्वत: याबाबत घोषणा केली होती. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. काही दिवसांनी पुन्हा युतीचे संकेत जलील यांनीच दिले होते.

Visit : policenama.com