…म्हणून MIM च्या 6 नगरसेवकांची पक्षाकडून हकालपट्टी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील निवडणूका पार पडल्यानंतर आता भाजप – शिवसेनेची औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणूकीत भाजपचा मोठा पराभव झाला असून त्यात शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी बाजी मारली आहे. यात विशेष ठरले ते उपमहापौर पदाच्या निवडणूकीत एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.

शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी काँग्रेसच्या 6, राष्ट्रवादीच्या 2 आणि एमआयएमच्या 2 सदस्यांच्या बळावर विजय मिळवला. यावेळी एमआयएमच्या अनेक आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे एमआयएमच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपमहापौरपदाच्या निवडीदरम्यान एमआयएमचे 5 नगरसेवक अनुपस्थित होते. तर दोन नगरसेवकांनी शिवसेनेला तर एका नगरसेवकांना भाजपप्रणित अपक्ष उमेदवाराला मतदान केले.

या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी गैरहजर 5 तर भाजप प्रणित अपक्ष उमेदवाराला मतदान केल्याने 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर शिवसेनेला मतदान केलेल्या दोन नगरसेवकांची याआधीच हकालपट्टी करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/