विधानसभा 2019 : MIM ‘स्वबळावरच’ ! मुंबईतील 5 उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममधील संभाव्य युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी एमआयएमने मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी स्वत: ट्विट करत ही यादी जाहीर केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होईल अशी चर्चा सुरु होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की होते की, “वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला 8 जागांचा प्रस्ताव दिलाच नव्हता. त्यांच्यासोबत युती बाबत चर्चा सुरू होती. परंतु अचानक त्यांनी युती होणार नसल्याचं जाहीर केलं. वंचित सोबत न येण्याचा निर्णय त्यांचा आहे. असं असलं तरी आमचं दार त्यांच्यासाठी अजूनही खुलं आहे.” असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं.

एमआयएमने मुंबईतील कुर्ला, वांद्रा पूर्व, भायखळा, अणुशक्तीनगर व अंधेरी पश्चिम या पाच मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यातील भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. एमआयनएमनं उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर स्पष्ट होतं की आगामी निवडणुका एमआयएम स्वबळावर लढणार आहे.

एमआयएमची पहिली यादी-

1) रत्नाकर डावरे- कुर्ला
2) वारीस पठाण- भायखळा
3) सलीम कुरेशी- वांद्रे पूर्व
4) आरिफ शेख- अंधेरी पश्चिम
5) सरफराज शेख- अणुशक्तीनगर

Visit : policenama.com