गणेश विसर्जनाकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचे मिनी हॉस्पिटल सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक पुण्यामध्ये येतात. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात मोठ्या संख्येने गणेश भक्त पुण्यात हजेरी लावतात. या काळात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांवर असते. पण गणेशोत्सव काळात पोलिसांना तसेच गणेश भक्तांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0253e5c-be6f-11e8-9383-af6aae6e5e4c’]

पुण्यात गर्दीच्या ठिकाणी येणारी आपत्ती विचारात घेऊन गणेश भक्तांना आणि बंदोबस्तावरील पोलिसांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मिनी हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांची टीम आणि रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत देण्यात येत आहे. जर काही अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास पुढील उपचाराकरिता रुग्नाला संजीवन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची देखील सोय करण्यात आली आहे. रविवार, दिनांक २३ आणि सोमवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी निरंजन सेवा भावी संस्था आपल्या मिनी हॉस्पिटल सहित वैद्यकीय सेवा देण्याकरिता सज्ज असणार आहे.

गणपती विसर्जना दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

विश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात निरंजन सेवाभावी संस्थेने दरवर्षीप्रमाणे मिनी हॉस्पिटल उभारले असून त्यामध्ये ५ बेड, सर्व प्रकारच्या औषधांसह इंजेक्शन, सलाईन उपलब्ध करण्यात आले आहे. महिलांकरीता २ बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. संजीवन हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागातील (आयसीयु) दोन तज्ज्ञ डॉक्टर्स देखील असणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीकरीता २२ डॉक्टर्ससह सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच या अद्ययावत मिनी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी दिली.

अन्यथा … गणपती नाही तर, सरकारचे विसर्जन

 विसर्जन मिरवणूक आपत्कालीन सेवेसाठी मिनी हॉस्पिटल, रुग्णवाहिका व डॉक्टरांचे संपर्क क्रमांक 
१) डॉ.आश्लेषा कुमावत :- ९५०३९११४२६
२) डॉ.अनिल शर्मा :- ७८८७८८२६९९
३) डॉ.दिपाली  केंद्रे :- ९९७००२१९३९
४) डॉ.प्रियांका फटांगणे :- ७३८७८०२९७९
५) डॉ.रश्मी त्रिपाठी :- ८८५११७६९३८
६) डॉ.चंदन खैरकर :- ९१७५९१०४६७
७) जयेश कासट :- ८००७८८४४८३